"बौद्ध संस्कृती आणि स्त्री" विषयावर रोटरी भवनात व्याख्यान
जळगांव : आपल्याशी हे सामायिक करताना अत्यंत आनंद होतो की, आज 18 एप्रिल 2025 रोजी जळगाव येथील पोर्णिमा वुमन्स फाउंडेशन यांच्यावतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रोटरी भवन, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मी "बौद्ध संस्कृती आणि स्त्री" या विषयावर मांडणी करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती. तसेच पोर्णिमा वूमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष आयुष्यमती शालिनीताई बिऱ्हाडे, साहित्यिक पुष्पाताई साळवे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील सहाय्यक प्राध्यापक शंकर यशोद, तथागत सुरवाडे व विद्यार्थीनी कु. सुकन्या जाधव यांनी एम. ए. इन आंबेडकर थॉट्स, या अभ्यासक्रमाविषयी उपस्थितांना माहिती देऊन अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आव्हान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आयुष्यमती किरण वनकर मॅडम यांनी केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन हे महिलांनीच केलेले होते व या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments