Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोद्याच्या विकासासाठी निधी देणार; शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

शेकडो नागरिकांच्या प्रवेश : संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा 

तळोदा : जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी करून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. तळोद्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारन भरघोस निधी दिला.शहराच्या विकास होऊन सामान्यातल्या सामान्य नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. 



          तळोदा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश पराडके, विजय पराडके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड. राम रघुवंशी, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, शिवसेना महिला प्रमुख सुनीता पाडवी, देवमन पवार, वकील पाटील, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, माजी नगरसेविका अनिता परदेशी, माजी नगरसेविका प्रतीक्षा दुबे,तालुकाध्यक्ष अनुप उदासी माजी नगरसेविका सुनयना उदासी, लक्ष्मण वाडिले आदी उपस्थित होते.

         यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या सेवेच्या वसा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचे प्रश्न सोडवीत आहेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एकच जात शिकवली ती म्हणजे पोटाची जात. गोरगरिबांची पोट कशी भरतील यासाठीच आम्ही काम करतोय.भविष्यात विविध समित्यांवरील पदांच्या माध्यमातून शिवसैनिकांना सन्मान मिळवून देत संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल.कुठल्याही शिवसैनिकाला गालबोट लागणार नाही ही आमची जबाबदारी असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

        याप्रसंगी चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, आगामी काळात महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील मात्र जे येतील त्यांच्यासोबत व जे नाही येणार त्यांच्या शिवाय शिवसेना निवडणुका लढेल असे जाहीर केले.आमदार आमश्या पाडवी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तीर्थ योजना आदी योजना एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केल्या. आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

        यशस्वितेसाठी माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी,केसरसिंग क्षत्रिय,आनंद सोनार,गणेश राणे,राहुल पाडवी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महानगरात तळोदा कार्यालय पॅटर्न 

     तळोदा शहर शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे कौतुक करत मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की,प्रत्येक महानगरात प्रत्येक शाखेचे अशा स्वरूपातील दिमाखदार कार्यालय आगामी काळात सुरू करण्यात येईल.अशा कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मालेगाव शहरात अशा स्वरूपातील कार्यालय लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेकडोंवर मुस्लिम बांधवांचा सेनेत प्रवेश

       संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. रॅली बिरसा मुंडा चौकात आल्यानंतर बिरसा मुंडांच्या पुतळ्यास मंत्री दादाजी भुसे,आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.आमश्या पाडवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात तळोदा शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यात मुस्लिम समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग होत

Post a Comment

0 Comments