मोहिनी विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन : पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा
पनवेल /प्रतिनिधी
चुल आणि मुल या विश्वातून बाहेर पडत महिला आपले कर्तृत्व विविध क्षेत्रात सिध्द करत आहेत. महिला चषक स्पर्धेत महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार मित्र असोसिएशनचे विविध उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असतात.जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर झालेला हा महिला चषक अभिमानास्पद आहे असे गौरवोदगार विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या सौभाग्यवती मोहिनी विक्रांत पाटील यांनी काढले. पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस ॲकॅडमी येथे श्री. प्रल्हादराय झुलेलालट्रस्ट आणि पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे महिला चषक क्रिकेट स्पर्धा झाल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सौभाग्यवती मोहिनी विक्रांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे, कामोठेपोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक विमल बिडवे, पनवेल वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, निसर्गोपचार तज्ञ डॉ. पल्लवी पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक गिते, डॉ. प्रमोद पाटील, जीवन कोंडीलकर, माजी नगरसेवक अनिल बहिरा,नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे प्रमुख पाहुणे होते.सकाळी दहा पासून सुरु झालेल्या स्पर्धा फलंदाज अन् गोलंदाजांच्या उत्साहाने उत्तरोत्तर रंगत गेल्या.
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या संघाने प्रथम तर कामोठे पोलिस ठाण्याच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल संघाने तृतीय क्रमांक पटकावला.ॲङ मनोहर सचदेव यांच्या सुमधूर आवाजातील क्रिकेट कॉमेंट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. राजेश लौटी यांनीहंपायरची भुमिका निभावली.
पैठणीची लयलूट
प्रथम आणि व्दितीय विजेत्या संघातील सहभागी सर्वच महिलांना आकर्षक पैठण्या देण्यात आल्या. मनमोहक आणि आकर्षक रंगातील पैठण्या जिंकल्यानंतर या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सकाळपासून स्पर्धास्थळी दाखल झालेल्या खेळाडूंसह
प्रेषकांनी दुपारी बिर्याणीवर यथेच्छ ताव मारला. असोसिएशनचे संस्थापक केवल महाडीक, मार्गदर्शक दिपक महाडीक यांनी आयोजन केले.
स्पर्धेत सहभागी महिला चषक टिम
पनवेल उपजिल्हा रुग्णालय : ज्योती दिपक गुरव, पुनम परशुराम वाडकर, सुरेखा तपकिरे, वृषाली वायरे, लक्ष्मी नागापुरे, बरखा गौतम, रेश्मा सावंत, शेडगे शर्मिला भरत, पिंकी येलवे, स्वाती नितीन शिंदे, सारिका प्रणव मानकामे, सुनंदा दांडेकर, हर्षदा हर्षद पाटणकर,
प्रभा प्रदिप पाटील, नेहा अवधुत चव्हाण. हार्मोनी स्पोर्टस क्लब : गुड्डी, अपर्णा, ज्योती ठाकूर, चैताली, शितल, रितीका, ज्योती मेहरा, अस्मीता. गोदरेज टायटन्स : खुशी घोष, अश्विनी भोसले, श्रीती सिंग, अनुश्री खेडवाल, राजश्री मालो, तेजस्वी घनवट, जमुना सनल क्रीश्ना,
पूजा चिंडालीया, सीमा सागर शेठ, शितल सोनवणे, शिल्पा चंदाने. अष्टविनायक फेज २ : रेणूका, शिल्पा, देवश्री, सपना, परुल, रंजना, शमा. गेम चेंजर : मानसी बांगर, सुखदा तेरे, संगीता जाधव, जयश्री परगवकर, पायल घोरमारे, स्मीता शर्मा, अर्चना सिंग, राजश्री कोल्हे,
कामोठे पोलिस ठाणे : दिपा पवार, अनुराधा कोळी, श्रीवंता सुर्यवंशी, दिपाली वाघचौरे, सुप्रिया कदम, संजुला मोहिते, प्रिया मोरे, उषा कोरडे, सुप्रिया सरोदे.
पनवेल शहर पोलिस स्टेशन :साधना पवार, सुशीला सवार, देवांगी म्हात्रे, ज्योती कांहडळ, वर्षा पाटील, मीरा आंबेकर, इंदू भोईर, तेजस्विनी काशीद, बेस्ट बॉलर

Post a Comment
0 Comments