शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे उद्या तळोद्यात ;शाळा अलर्ट मोडवर
असा असेल दौरा
तळोदा/प्रतिनिधी:
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उद्या तळोदा दौऱ्यावर असून शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे व यावेळी नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी व विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांच्या जाहीर नागरिक सत्कार समारंभ देखील त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिक्षण मंत्र्याच्या दौऱ्यांमुळे शाळा अलर्ट मोडवर असून मंत्र्यांच्या दौरा सुखरूप पार पडावा शिक्षण विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
तळोदा शहरात विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले.महाविकास आघाडीतील विविध नेते व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय समीकरण बदलले व त्यातच चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदारकी मिळाली. यामुळे तळोदा शहरातील नवीन व जुन्या सर्व शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
तळोदा शहरातील जुन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयाचे रूपांतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात झाले असून त्याचे उद्घाटन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या
हस्ते शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास होणार आहे.
नामदार दादा भुसे यांच्या राजकीय दौरा असला तरी शिक्षण विभागाकडून मोठी दक्षता घेण्यात येत आहे.शिक्षण मंत्री महोदय यांचा नंदुरबार जिल्हा दौरा निश्चित झाला असून दि.११ एप्रिल रोजी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात येणार आहेत.मार्गावरील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सूचित करून शालेय कामकाज, पोषण आहार इ. व्यवस्थित सुरू राहील याची दक्षता घेण्यास सांगण्यात यावे अशा सूचना व्हॉट्स ॲप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिल्या आहेत.
तळोदा दौऱ्यासाठी दु. ०१.०० वा. शासकिय वाहनाने मालेगांव येथुन धुळेकडे प्रयाण करणार आहेत.दु. ०२.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथेशालेय शिक्षण विभाग संबंधित आढावा बैठकीस उपस्थिती लावणार आहेत.सायं. ०४.०० वा.मनभावन हॉल, आबासाहेब आर. आर. पाटील कॉम्प्लेक्स, पवनपुत्र चौक, पारोळा रोड, धुळे. येथे शिवसेना पक्ष पदाधिकारी बैठकीस उपस्थिती राहणार आहेत. त्यांनंतर शासकिय वाहनाने धुळे येथुन नंदुरबारकडे प्रयाण करणार आहेत सायं. ०५.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार.येथे शालेय शिक्षण विभाग संबंधित आढावा घेणार असून सायं. ०६.०० वा.शासकिय वाहनाने नंदुरबार येथुन तळोदाकडे प्रयाण करणार आहेत.सायं. ०६.४५ वा.तळोदा येथिल शिवसेना जनसंपक कार्यालय उद्घाटन व नागरी सत्कार सोहळयास उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमानंतर तळोदा येथुन मालेगांव, जि. नाशिककडे प्रयाण करणार आहेत.

Post a Comment
0 Comments