शिक्षण, संवाद आणि विकासाचा समन्वय!
तळोदा: नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नुकतीच ई.आर.एम.एस. (ERMS) नंदुरबार विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच सुरू असलेल्या योग सत्राचे निरीक्षण करण्यात आले.
विद्यालयाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये कंपाउंड वॉलचे काम, नवीन इमारतीचे काम, ई.आर.एम.एस. ढोंगसागळी येथील इमारत बांधकामाची वेळापत्रक व इतर बाबींचा समावेश होता. संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची ईआरएमएस विद्यालयाला भेट
April 19, 2025
0

Post a Comment
0 Comments