कारवाईनंतरही ठेकेदार जुमाने ना ; दिवसाढवळ्या वीजचोरी
तळोदा : तळोदा शहरात रस्त्या व गटारीचे काम करत असताना ठेकेदाराने चक्क वीज चोरी केल्याच्या प्रकार समोर आला आहे. रस्त्याचे काम करणारा ठेकेदारच वीज चोर निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तळोदा नगर परिषदेंकडून नगरोस्थान योजनेअंतर्गत चार ते पाच कोटीची रस्त्याची विकास कामे मंजूर करण्यात आली आहे यात रस्त्याच्या दुतर्फा गटार व काँक्रीट रस्त्याच्या समावेश आहे कालभैरव मंदिर ते पार्वती रामदास नगरच्या पुढे फॉरेस्टच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे काम मंजूर झाले असून मागील चार महिन्यापासून गटारीच्या व रस्त्याच्या कामाला कालभैरव मंदिराच्या बाजूने सुरुवात करण्यात आलेली आहे.
गटारीचे दुतर्फा निम्मे काम झाले असून हे काम करताना ठेकेदाराला लोखंडी सळ्या कापणे व इतर कामांसाठी विजेची गरज होती.यासाठी ठेकेदार कंपनीने अधिकृतपणे वीज वितरण कंपनीकडून एवढ्या मोठ्या वाणिज्य विषयक कामासाठी वीज मीटर घेणे अपेक्षित होते.मात्र असे न करता त्यांनी चक्क बेकायदेशीर रित्या विजेच्या तारांवर आकडा टाकलेला आहे. रस्त्याचे कामाच्या सुरुवातीपासून ठेकेदाराने चक्क वीज चोरी करायला सुरुवात केली.
दिवसाढवळ्या सरसपणे ठेकेदाराकडून विविध चोरीच्या प्रकार सुरू असताना वीज वितरण कंपनीने या सर्व प्रकाराच्या पंचनामा केल्या असल्याची माहिती देखील सांगितली त्याचप्रमाणे भागातील वायरमन यांनी दोन वेळा त्यांची वायर देखील जप्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र वीज विभागाने केलेल्या कारवाईला न जुमानता वीज चोरीचा प्रकार सुरूच ठेवला आहे. याबाबत कंपनीचे मॅनेजर मयुरकुमार यांना विचारले असता डिमांड भरली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मागील चार महिन्यांमध्ये तळोदा शहरात भरारी पथकाने वेळोवेळी कारवाई करत आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांना व मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या वीज चोरांवर जरब बसवण्याच्या प्रयत्न केला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला अभय का देण्यात आले? सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय व धनाढ्य ठेकेदारांसाठी वेगळा न्याय का? असा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकारी म्हणतात : –
तिरुपती पाटील, कार्यकारी उपअभियंता,महावितरण तळोदा
तळोदा शहरात रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराकडून अशा प्रकारे आकडे टाकून वीज चोरी करण्यात येत आहे


Post a Comment
0 Comments