शिरपूर : तालुक्यातील वाघाडी येथील सर्पमित्र दिनेश बोरसे यांना वन्यजीव मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार व इंडियन नॅचरल हनीबीज, पुणे चे संस्थापक मा. श्री संजय मारणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सापमित्र म्हणून निसर्ग संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेष योगदान देणाऱ्या १५ सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष शेकनाथ महिदे यांचा सुद्धा वन्यजीव मित्र म्हणू पुरस्कार देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात उत्कृष्ट मधमाशी पालन, संरक्षण व उत्पादन क्षेत्रातील कार्याबद्दल १५ मधमाशीपालकांना “मधमाशी पुरस्कार” ट्रॉफी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

Post a Comment
0 Comments